“सरसंघचालक मशिदीमध्ये जातात तेव्हा तुम्ही का प्रश्न विचारत नाही?”

 

काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच मराठी मुस्लिम सेवा संघाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार करताना, सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते काय, अशी विचारणा केली आहे.

दैनिक सामना अग्रलेखावरून आशिष शेलार म्हणाले होते की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुस्लिम आणि मराठी मते हवी आहेत. राजकीय स्वार्थासाठी चतुराईने शब्दांचा खेळ केला गेला आहे. भाजप मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार आणि या तुष्टीकरणाच्या राजकारणाबद्दल जागरुकता निर्माण करेल, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला होता.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही मराठी मुस्लिम असा उल्लेख केला आहे, त्यावरून आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. सरसंघचालक मशिदीमध्ये जातात तेव्हा तुम्ही का प्रश्न विचारत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी चादर चढवायला का जातात, आशिष शेलारांनी हेही सांगावे, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: