बंडखोर आमदार भाजपच्या स्क्रिप्टवर काम करतायेत’,अंबादास दानवे यांनी साधला निशाणा

 

शिवसेना पक्षातून बंडखोरी करून बाहेर पडलेले आज भारतीय जनता पक्षाच्या स्क्रिप्टवर काम करत असून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या खदखद सुरू आहे. तर त्यातील अर्धे अधिक आमदार आताच परेशान झाले आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत नव्हे तर त्या अगोदरच शिवसेना सत्तेवर येईल. त्यामुळे शिवसेना फार काळ विरोधात बसणार नाही असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेने कार्यालयात बैठक घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, मला पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले असले तरी अद्याप आपण त्या खुर्चीवर बसलेलो नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फार काळ खुर्चीवर बसायचे नाही, असा मंत्र दिल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगून दानवे यांनी भाजपावर टीका केली.

तसेच पक्ष सोडण्यासाठी विविध कारणे बंडखोरांकडून दिली जात आहेत. तरी ज्यावेळी ते सेनेत मंत्रीपदावर होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सारे धंदे बंद केले होते. ते धंदे बंद झाल्यानेच ही मंडळी नाराज होती. आता सत्तेत गेल्यामुळे त्यांचे धंदे पुन्हा सुरू झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. य टीकेला शिंदे गे काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: