अजितदादा म्हणाले, ‘प्रशिक्षणाला येतो’, फडणवीसांनी दिले खरमरीत प्रतिउत्तर

 

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलच शब्दहीक युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. अजितदादांनी प्रशिक्षण कधी मिळेल, अशी विचारणाच फडणवीसांना केली तर, फडणवीस यांनीही ऑनलाईन प्रशिक्षण करू, अशी कोपरखळी लगावली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आल्यामुळे अजितदादांनी आपल्या शैलीत टीका करत फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेणार, असा टोला लगावला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याचे म्हटलं होतं, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘त्यांना एवढी तसदी घेण्याची गरज नाही, ऑनलाईन प्रशिक्षण करू, गुरुकिल्ली एवढीचं सांगतो, की ज्या पद्धतीने ते पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो’ असा टोलाही फडणवीस यांनी अजितदादांना लगावला.

Team Global News Marathi: