बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाकडून अनेक कार्यक्रम

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतसाठी मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत.शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात ठिकठिकाणी बॅनर लावलेले दिसतात. संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार शिवतीर्थावर दाखल होऊन बाळासाहेबांना अभिवादन करतील

17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने वाद टाळण्यासाठी एक दिवस आधीच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिंदे गटाकडून विशेष ‘वारसा विचारांचा’ परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहाणार असून ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बाळासाहेबांच्या आठवणी, किस्से तसेच आगामी काळातली रणनीती आणि वाचळवीरांची शाळा असं हे शिबिर असणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता दादरच्या सावरकर स्मार इथे हा कार्यक्रम पार पडेल. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात एक दिवस आधीच शिंदे गटाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. दादरमधील सावरकर स्मारक इथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून तरुणांना मोबाईल व्हॅन (फूड ट्रकचं) आणि टुरिस्ट कारचं वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे.

Team Global News Marathi: