‘बाळासाहेबांच्या सून हे लक्षात ठेवून पुढे वागावं’, स्मिता ठाकरे-शिंदे भेटीवर सेना नेत्याचं सूचक विधान

 

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात दोन गट पाडण्याचे चित्र दिसून आले होते अशातच अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे त्यांची साथ सोडून शिंदे गटात सामील होणे अधिक पसंत केले होते अशातच या दोन्ही गटाकडून आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेब ठाकरेंच्या सून स्मिता ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचं नेमकं कारण अजून गुलदस्त्यातच आहे.

शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया दरम्यान एकनाथ शिंदे आणि स्मिता ठाकरे यांच्या भेटीवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येकाला भेटीचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, पण त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आहेत, हे लक्षात ठेवून पुढे वागावं, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला आहे, यावरही नीलम गोऱ्हे बोलल्या. त्यांना काय लिहायचं ते लिहू द्या, शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महत्त्वाचं आहे. आम्ही उद्धव साहेबांसोबत पक्ष वाढवणार. काही जण टीकेची फुलं वाहतात, त्यात निवडुंगाची फुलं आहेत. आजच्या वाढदिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. सोबत कोण आहे, हे समजेल, असं वक्तव्य गोऱ्हे यांनी केलं.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं?

एकनाथ शिंदेंनी कोरोनात जास्त काम केलं, आपलं कामही पक्षप्रमुखांना दिलं

Team Global News Marathi: