बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीनं बंडखोरांना धडा शिकवणार – आदित्य ठाकरे

 

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली असं मत त्यांनी व्यक्त करत गेली ती घाण गेली असा घणाघातही त्यांनी बंडखोर आमदारांवर त्यांनी केले. ज्या बंडखोर आमदारांनी कारणं सांगत बंडखोरी केली आहे, त्यांची किती तरी कामं आपण केली आहेत, आणि जो जनतेचा निधी आहे, तो जनतेला तात्काळ दिला आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकार ही टेस्ट घडवून आणण्यासाठी केंद्रीय बळाचा वापर करेल पण शिवसैनिक शिवसैनिक आहेत.हिंमत असेल, शिवसेनेसोबत लढण्याची ताकद असेल तर राजीनामे पाठवा आणि आमच्याविरोधात निवडणुकीला तयार राहा. दगाबाजांना आता महाराष्ट्रात जागा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीनं बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचं ठरवलं आहे.

Team Global News Marathi: