आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं

 

आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं आहे. त्यांनी अनेक प्रकल्प आणावेत. फक्त पर्यावरणाचा समतोल राखला जावा याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत, असं ऐकलं आहे. दिल्लीत त्यांनी बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी मागण्या असल्याचे अजित पवार म्हणाले.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेट कोर्टात जावं असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काही वेळेस उच्च न्यायालयात जाऊन देखील परवानग्या घेतल्या आहेत. मागे कोरोनाच्या काळात ते घडलं आहे. बीकेसीत शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. त्यांना ती जागा मिळाली असली तरी इकडची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावी. दोघांनी मेळावे घ्यावे, दोघांचे विचार राज्यानं ऐकावे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: