बडतर्फ अधीकारी सचिन वाझेबद्दल अजित पवारांचे खोचक विधान

 

मुंबई | अँटिलिया घराजवळ स्फोटके प्रकरणामुळे गोत्यात आलेले मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या प्रकरणामुळे त्यांना चौकशीला सामोरे जाऊन जेलची हवा खावी लागत आहे. या प्रकरणाचे मूळ असणाऱ्या सचिन वाझेबद्दल आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक वक्तव्य केले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आधी काही गैरप्रकार झाला की इथे बोफोर्स झाला असं म्हटलं जायचं. अगदी खेडेगावात जरी काही झालं तरी बोफोर्स झालं म्हणायचे. आता असं म्हणतात की, याचा सचिन वाझे झाला. हा सचिन वाझे आहे. कुठुन दुर्दशा आठवली आणि त्याला सर्विसमधे घेतलं. अर्थात कायदा आपलं काम करतोय. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होतं. ते होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि चांगलं काम करा.

पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालय येथे चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावर अजित पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले होते मात्र त्यांनी थेट सचिन वाझेयाच्या विषयाला खात घालून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला त्याची नावं करून दिली होती.

Team Global News Marathi: