बबिता’जी फेम मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत राज अनादकत’ने केला मोठा खुलासा |

 

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पू आणि बबिता जीची भूमिका साकारणारे राज अनादकत आणि मुनमुन दत्ता काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत असून हे दोगीही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा जोरदार होऊ लागली होती ही बातमी जाणून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. आधी दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण आता मुनमुन आणि राज यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे.

मुनमुनने प्रथम सांगितले की, तिला भारताची मुलगी असल्याची लाज वाटते, तर मुनमुन नंतर आता राज या संपूर्ण प्रकरणावर बोलला आहे. राज यांनी त्यांच्याविरोधात चुकीचे लिहिणाऱ्यांना संदेश दिला आहे की ,अशा बातम्यांमुळे त्यांच्या जीवनावरही परिणाम होतो अशी ऑप्सत त्यांनी इंस्टग्रामवर लिहिली आहे.

तो आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितो की, फक्त विचार करा की तुमच्या या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. माझे मत जाणून न घेता माझ्याबद्दल काहीही लिहित आहात. जे काही सर्जनशील लोक माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांची सर्जनशीलता इतरत्र दाखवा. देव त्या लोकांना थोडी समज दे. तर मुनमुन लिहिते की, तिला स्वतःला भारताची मुलगी म्हणण्यास लाज वाटते असे तिने लिहिले आहे.

Team Global News Marathi: