‘बाबा रामदेव’जी बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार फक्त राज ठाकरे हेच होऊ शकतात’ – सतीश नारकर

 

 

रामदेव बाबा यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाण्यात शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार असल्याच्या भावना रामदेव बाबांनी भेटीनंतर व्यक्त केल्या मात्र त्यांच्या या विधानावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

आज एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्यांच्या सोबत युती करून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती तर दुसरीकडे शिंदे गटाने सत्तेसाठी शिवसेना पक्ष फोडून नवा गट तयार केला होता मात्र सत्तेसाठी कदापि बाळासाहेबांनी बंडखोरी केली नाही हाच मुद्धा उपस्थित करत मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख केला आहे.

 

 

या संदर्भात ते ट्विट करून म्हणतायत की.” बाबा रामदेव’जी प्रथम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण समजावून घ्या, वंदनीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापायी कदापि आपल्या विचारांशी गद्दारी केली नाही आ णि आज त्यांच्या विचारांचा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे करत आहेत !! असे त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: