आझाद मैदानात व्हॅनिटी कार कशासाठी? सदावर्तेंचा संभाजीराजेंवर निशाणा

 

मुंबई एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आंदोलन सुरू होऊन तीन महिने उलटले असले तरी यावर म्हणावा तसा तोडगा निघाला नाही.या प्रकरणी सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. विलीनीकरणाची मागणी व्यावहारीक नसल्याचा निष्कर्ष काढत त्रिसदस्यीय समितीने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा झटका दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केलं. मात्र, सरकारनं दिलेल्या आश्वासनांनंतर त्यांनी उपोषण सोडलं.संभाजीराजेंच्या या उपोषणावर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंनी टीका केलीय. लोकमतनं ही बातमी दिली आहे.”खासदार संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ जून महिन्यात संपतोय. त्यामुळे संभाजीराजे व्हॅनिटी कार घेऊन आझाद मैदानात बसले,” असं अॅड. सदावर्ते म्हणाले.

सदावर्ते पुढे म्हणाले, “ज्यावेळेस माणूस आत्मक्लेष एकत्रित करुन, चिंतनासाठी बसतो, त्यावेळेस व्हॅनिटी कार घेऊन बसत नाही. आम्हाला कधी त्याची गरज पडली नाही, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतही कधी व्हॅनिटी कार मी पाहिल्या नाहीत.”नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आझाद मैदानात जाऊन संभाजीराजेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होतं. हे आमरण उपोषण अडीच दिवसच चाललं.

Team Global News Marathi: