“ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली.” संभाजी राजेंच्या निलेश राणेंचा सल्ला

 

मुंबई राज्यसभेच्या उमेदवारीसाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घालण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली आहे. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना सल्ला दिला आहे.

“कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की, ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केले असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच शिवबंधनासाठी मातोश्रीवर या, असा मुख्यमंत्री ठाकरेंचा निरोपही त्यांना देण्यात आला आहे.

Team Global News Marathi: