कल्याणमधील बांधण्यात येणाऱ्या निकृष्ट रस्त्यांच्या कामावर राजू पाटील आक्रमक

कंत्राटदार कामाचा दर्जा दाखवत नसतील तर आम्हाला शेवटी मनसे स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कंत्राटदाराला दिला आहे. कल्याण डोंबिवली मध्ये बांधण्यात आलेल्या निष्कृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामावर त्यांनी ताशोरे ओढले आहे.

मागच्या काही दिवसांपासून कल्याण-शीळ रोड हा ६ पदरी करून यावर कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर चालू असून कल्याण फाटा ते पालवा पर्यंत जवळपास ८०% काम पूर्ण झाले आहे. तर पुढील रस्त्यावर सुद्धा कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम चांगल्या दर्जाचे केले जात आहे का असा प्रश्न मनसेआमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सुयोग हॉटेल ते पेंढरकर कॉलेज रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. पीडब्लूडीच्या माद्यमातून हे काम करण्यात येत आहे.मात्र या बांधकामाच्या निष्कृष्ट दर्जासंदर्भात नागरिकांनी आमदार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.

रस्त्याचे काम होत असल्याने रस्त्याची उंची वाढत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आजूबाला पाण्याचा निचरा होण्यासाठी कलवर्टची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी व्यवस्थाच नसल्याची तक्रार नागरिकांनी केली पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच कलवर्ट नसतील तर पाण्याचा निचरा कसा होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरिकांनी आमदार राजू पाटील यांच्याकडेच यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पाण्याचा निचरा झाला नाही, तर अनेक समस्या निरमा होऊ शकतात. रस्त्याचे काम करताना त्यासाठी आधी रस्ता पूर्णपणे खोदून नंतर त्यावर भराव टाकला गेला पाहिजे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच एकावर एक थर अंथरुन काम केलं जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहराला खड्ड्यात टाकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे.

Team Global News Marathi: