प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पहा, भिकार सिरीयल पाहणे बंद करा

 

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मालिकांचा घसरत चाललेल्या दर्जावरुन विधान केले आहे. प्रेक्षकांनी अगोदर स्वत:चा चॉईस तपासून पाहावा, आणि निश्चित करावे. आपला वेळ वाया घालवू नका. त्यामुळे भिकार सिरीयल पाहणे बंद करा कारण तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील असे म्हटले आहे.

प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणे बंद केल्यास अशा सिरीयलची निर्मिती होणार नाही, आणि मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सिरीयल नक्की पहा असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले आहे. ते कल्याण येथे सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलत होते.

तसेच पुढे ते म्हणाले की, ज्याला काही अर्थच नाही अशा मालिका, सिन्स आणि असे सगळे कलाविष्कार बघण्यात तुम्हाला काय मिळते? तुम्हाला अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, अभिनय महत्वाचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माझी विनंती आहे की, आधी तुमच्या चॉइसवर बंधनं घाला, तो तपासून पाहा. आपण काय पाहतोय? यामध्ये काही बुद्धीजीवी आहे का?, काही विचार आहे का? हे तपासून पाहा. उत्कृष्ठ पाहा, उत्कृष्ठ अनुभवा, उत्कृष्ठ वाचा. आणि ते मिळत नसेल तर बंद करा असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले आहे.

Team Global News Marathi: