उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये नातलगांच्या अश्रूंचा बांध फुटला,

 

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तळीये दरड दुर्घटनेत एकूण ८४ जणांनी आपला प्राण गमावला होता. मंगळवारी तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता.

२२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळीये गावात पूर्ण डोंगर वाडीवर कोसळला. सरकार आणि प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले. मात्र, एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही. ५४ मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित ३१ नागरिकांना मृत घोषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आला आहे. काही मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.

Team Global News Marathi: