बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे अक्षय -कतरिना’चा ‘सूर्यवंशी

 

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ’चा ‘ सूर्यवंशी’ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. सिनेमाला पहिल्या दिवशीच बंपर ओपनिंग मिळाली असून आता दिवसेंदिवस कमाईचा आकडा वाढतच चालला आहे. सिनेमातील जवळपास सगळेच स्टार्स महागडे आहे. कतरिना आणि अक्षय सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अक्षय आणि कतरिनाने या सिनेमासाठी किती पैसे घेतले याचीही चर्चा होत आहे.

एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने सूर्यवंशी सिनेमात काम करण्याचं मानधन २५ कोटी रूपये घेतलं आहे. तर कतरिना कैफने सिनेमासाठी १० कोटी रूपये मानधन घेतलं. अक्षयने सिनेमात पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. तेच कतरिनाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांचीही केमिस्ट्री फॅन्सना खूप आवडली.

‘सूर्यवंशी’ मध्ये अजय देवगन आणि रणवीर सिंह हेही दिसले आहेत. मात्र, त्यांनी या सिनेमासाठी एक रूपयाही मानधन घेतलं नसल्याची चर्चा आहे. त्यांनी फ्रीमध्ये काम केल्याचं बोललं जात आहे. तेच जॅकी श्रॉफने १ कोटी तर जावेद जाफरीने ५० लाख रूपये मानधन घेतलं आहे. मात्र सध्या हा चित्रपट बंपर कामे करताना दिसून येत आहे.

Team Global News Marathi: