पुण्यात शॉर्ट कपडे घातल्यानं तरुणींना चप्पलनं मारहाण

 

पुणे | शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित मुलींना चप्पलने मारहाण केली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ह्या खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात.

त्या वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात, या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे. याबाबत घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चप्पलनं मारहाण करत घर पाडण्याची धमकी याबाबत अधिक माहिती देताना तक्रारदार महिलेनं सांगितलं की, ‘संबंधित आरोपी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करतात.

यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरून वाद उकरून काढला आहे. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहा केली आहे. या प्रकरणी घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Team Global News Marathi: