किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणाऱ्या अशोक पंडिताला नेटकऱ्यांनी सुनावले !

 

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. भारताला पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात एखाद मेडल मिळालं आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीवर सर्व स्थरातून त्याचे कौतुक होत आहे,

मात्र दुसरीकडे बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी केलेलं ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “राजीव गांधी यांचं नाव बदलताच भारताला गोल्ड मेडल मिळालं” असं ते म्हणाले. मात्र यामुळे त्यांना जोरादार ट्रोल केलं जात आहे. मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं. या पार्श्वभूमीवर अशोक पंडित यांनी नीरज चोप्राला शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं काँग्रेसला टोला गलावला.

“राजीव गांधी यांचं नाव बदलताच भारताला गोल्ड मेडल मिळालं” असं ते म्हणाले. मात्र या ट्विटमुळे त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. “सुवर्ण पदक पटकवल्याचा आनंद दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर, किमान खेळात तरी राजकारण सोडा, मोदींच्या काळात भारताने क्रिकेटमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी पटकावलेली नाही, याबद्दल देखील काहीतरी बोला” अशा आशयाचे ट्विट करत अशोक पंडित यांना ट्रोल केलं जात आहे.

Team Global News Marathi: