विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेसची मागणी

मुंबई : आमदार नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न सतत विचारला जात होता. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसकडे सध्या खाती कमी आहेत. त्यात आता विधानसभा अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना निवडणुकीची घाई लागली आहे. सध्या विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपद राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. तसेच महाविकास आघाडी नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर,आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Team Global News Marathi: