‘असलं काही बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका’

 

नवी दिल्ली | मागच्या आठवड्यात काॅंग्रेसने महागाई विरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन केलंं. त्यावेळी काॅंग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली. या आंदोलनातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते. या आंदोलनात काॅंग्रेसने काळी कपडे घातल्याने या आंदोलनाची चर्चा देशभर सुरू आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टीका केली होती.

पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या या आंदोलनावर म्हणाले होते की, काही लोकांनी ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना वाटतं की, काळी वस्त्रे घातली तर आपल्या सर्व समस्या दूर होतील, नैराश्य दूर होईल. पण जादूटोणा, काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेतून ते जनतेचा विश्वास मिळवू शकत नाहीत. सध्या तुमचे वाईट दिवस सुरू आहेत, पण काळ्या जादूने तुमचे वाईट दिवस संपणार नाहीत, अशी टीका मोदींनी काॅंग्रेसवर केली होती.

मोदींच्या या वाक्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपले काळे कारनामे लपवण्यासाठी, ‘काळी जादू’ सारख्या अंधविश्वासाच्या गोष्टी बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका आणि देशाला भटकवणे बंद करा, देशाच्या मुद्द्यांवर उत्तर तर द्यायलाच लागेन, असं प्रत्युत्तर गांधी यांनी मोदींना दिलं आहे.

Team Global News Marathi: