अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्र्यांनी सुनावले

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्र्यांनी सुनावले

मराठा उपसमितीवरुन अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती.

यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशोक चव्हाण नीट काम करत आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही. तो विषयही मांडण्याचीही गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आज बैठकीत मेटे यांना खडेबोल सुनावले.

या बैठकीला उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनीही मेटेंच्या मागणीला विरोध करत अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचे मेटेंसमोर सांगितले. मेटे यांनी तरीही मराठा समाजाच्या यापुढील शासकीय बैठका एकनाथ शिंदे यांना घेण्यास सांगावे, अशी मागणी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्यालाही नकार दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: