असे साधुसंत येती घरा तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा”,सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला टोला

 

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक रोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप लागवताना दिसून येत आहे त्यातच त्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्याकडे वळवला होता. तसेच ड्रग्स माफियांशी फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी लगावला होता.

दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.

शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्विट करत सदाभाऊ खोत म्हणाले, “नवाब मिया पवार साहेबांच्या बरोबर कोण हे साधुसंत?, असे साधुसंत येती घरा तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा”, असा खोचक टोला खोत यांनी लगावला आहे.

 

Team Global News Marathi: