अनिल देशमुख यांना या प्रकरणात भाजपकडून फसवलं गेलय !

 

मुंबई | तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जवळपास अधिक काळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरूच होती. अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय, आरोप लावणारे परमवीर सिंग फरार आहेत. ही सगळी राजकीय कारवाई असून सरकारला बदमान करण्यासाठी आता अनिल परब यांचा नंबर असे म्हणत आहेत. हे नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. परमबिर सिंग पळाले की पळवून लावले ?असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, केंद्र सरकारच्या यंत्रणा संस्थांचा वापर करून राज्याला बदनाम भाजपकडून केले जात आहे. जे बंगालमध्ये सुरू होते ते महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपात गेलेले लोक म्हणतात आम्हाला आता सुखाची झोप लागते, असा खोचक टोला देखील नवाब मलिकांनी लगावला आहे.

 

 

Team Global News Marathi: