‘लवकरात लवकर पीडीतेला न्याय देऊ’: मुंबई पोलिस आयुक्त नागराळे यांची माहिती !

 

मुंबई | मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली असून ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार केल्याचं समोर आला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तत्पूर्वी सदर महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेवर आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी माहिती दिली आहे.

१० तारखेच्या मध्यरात्री साकीनाका येथील एका कंपनीमधील वॉचमने फोनद्वारे पोलिस कंट्रोल रुमला कळवले. त्यावेळी मुबंई पोलिस काही वेळातच पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ पिडितेला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. या चौकीदाराच्या तक्रारीवरुन या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर क्राईम ब्रॅंचचे अधिकारी कामाला लागले. आरोपीचे नाव मोहन असून त्याला संशयावरुन ताब्यात घेतले.

 

तपासादरम्यान त्याचे कपडे ताब्यात घेण्यात आले. 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. पुढील एक महिन्याच्या आत हा गुन्हा उघडकीस आणून हा तपास पूर्णपणे संपवला जाईल. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. काही संभ्रम यासंबंधी होता, त्यामध्ये चार आरोपी आहेत. मात्र तपासादरम्यान एकच आरोपी निष्पन्न झाला आहे. यामध्ये जी पीडीत आहे तिचा जबाब नोंदवता आला नाही. मात्र तपासादरम्यान अधिक माहिती घेता येईल. तसेच हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल.

Team Global News Marathi: