मी जिवंत असेपर्यंत शरद पवार यांना गुरुच मानत राहील -चित्रा वाघ

 

मुंबई | विधानसभा निवणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र आघाडीची सत्ता आल्यानंतर चित्रा वाघ नेहमीच ठाकरे सरकारवर टिका करत असतात.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोकणात आलेल्या महापुरावर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टिका केली आहे, प्रविण दरेकर, गिरीष महाजन, या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आधी कोकणात जातात हे जनतेकडे दुर्लक्ष असल्याचे लक्षण आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

तसेच यावेळी चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याबद्दल देखील एक वक्तव्य केले, त्या म्हणाल्या की, “शरद पवार हे नेहमीच माझ्या मनात आदर आहे, मी जिवंत असेपर्यंत त्यांना गुरुच माननार आहे. मी कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात गुरुंचे स्थान राहणार आहे”

Team Global News Marathi: