अर्थमंत्र्यांच्या संतापाला टीआरएसचे चोख प्रत्युत्तर, गॅस सिलेंडर ला लावले मोदींचे फोटो

 

रेशन दुकानात पंतप्रधानांचा फोटो नाही म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोठा हंगामा केला होता. सीतारामन यांनी यावेळी तेलंगणा सरकारवर केलेल्या टीकेवरून सत्ताधारी टीआरएसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गॅस सिलिंडरवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि सिलिंडरची किंमत दर्शविणारे पोस्टर्स लावून अर्थमंत्र्यांच्या संतापाला चोख प्रत्युत्तर टीआरएसने दिले आहे.

 

तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून गॅस सिलिंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावल्याचा क्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही एलपीजी सिलिंडरवर मोदींचा फोटो चिकटकण्यात आला आहे. ज्यामध्ये मोदी जी 1105 रुपये, असा उल्लेख कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी, तुम्हाला पीएम मोदींचा फोटो हवा असेल तर घ्या, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र राज्यमंत्री के. टी. रामाराव यांनीही या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अशा वर्तनाने मला धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात लावावा लागतो. पंतप्रधानांची पातळी इतकी खाली आहे का? असा सवाल तेलंगणाचे आरोग्यमंत्री टी. हरीशराव यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना केला आहे.

Team Global News Marathi: