पालघर | राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचे कल हाती येऊ लागला असून या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापली ताकद विजयासाठी लगावली होती. अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल हाती येत आहे. काही मतदारसंघात भाजपला तर सत्ताधाऱ्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागत आहे. असाच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून त्यांचा मुलगा रोहित गावित यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजेंद्र गावित यांचे पालघरमधील प्रस्थ असल्यामुळे रोहित यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना पराभवाचा बसला आहे. भाजपचे उमेदवार पंकज कोरे विजयी झालेत.
निवडणूक निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. पालघर जिल्हा परिषदमध्ये समाधान कारक निकाल लागला आहे. शिवसेनेने ५ जागा जिंकल्या आहे यामध्ये एकूण ११ जागा महाविकास आघाडीने जिकल्या आहे. गावित यांच्या जागेसाठी पुढे पुन्हा काम करणार आहोत. शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. ते मान्य करावे लागेल. पुन्हा आम्ही त्या जागेसाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करू, असे एकनाथ शिंदे म्हटले.