सेना आमदाराची भुजबळांशी बाचाबाची आता येवल्यामध्ये भगवा फडकवण्याचा सेनेने केला निर्धार !

 

नाशिक | पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव तहसील कार्यालयात जोरदार बाचाबाची झालेली पाह्यला मिळाली होती. छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात आज दिलजमाई झाली सुद्धा मात्र, दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून नियोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे.

त्यातच आता येण्याऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत येवला विधासभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवायचा निश्चय शिवसैनिकांनी केला. त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. आता छगन भुजबळ यांच्या समोर शिवसेनेकडून आव्हान उभे केले जाणार का असा प्रश्न यानिमिताने उपस्थित केला जात आहे. सेनेच्या या निर्यउळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि सेनेमध्ये शाब्दिक चकमक रंगलेली पाहायला मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येणाऱ्या दिवसात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजित नाशिक जिल्ह्यात करण्यात आले. येवल्यातून संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की पुढील निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना भुजबळांच्या अडचणी अधिक वाढवताना दिसून येणार आहे.

Team Global News Marathi: