अरबी समुद्रात वादळी वाऱ्यांचा धोका, कोकणासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे

 

अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होतं आहे. मात्र सुदैवाने हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. असं असलं तरी कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आणि उद्या कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील ४८ तास कोकणासाठी महत्त्वाचे आहेत. रविवारी सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी मुंबईसह कोकण आणि गोव्यात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.

मुंबईसह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ४८ तास कोकणासाठी महत्त्वाचे आहेत. रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. याचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असून आज आणि उद्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Team Global News Marathi: