नवाब मलिकांच्या नव्या आरोपांवर समीर वानखेडेंचं जोरदार प्रतिउत्तर

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक घणाघाती आरोप लगावले आहे. त्यातच आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर टीका केली आहे. यावेळी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी अर्थात क्रांती रेडकर यांच्या बहिणी संदर्भात सवाल उपस्थित केला आहे.

हा सवाल उपस्थित करताना मलिकांनी समीर वानखेडेंना उत्तर देण्यास सांगितलं. या सवालावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे. नवाब मलिकांच्या सवालावर उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, जानेवारी २००८ मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा मी सेवेतही नव्हतो. मी २०१७ मध्ये क्रांती रेडकरशी लग्न केलं. मग तरीही मी या केसशी कसा जोडला जातो?, असा सवालही समीर वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

क्रांती रेडकरच्या बहिणीच्या हर्षदा रेडकरच्या विरोधातला २००८ मध्ये दाखल असलेला गुन्हा अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार नाही तर बेकायदा देहविक्री केल्याप्रकरणीचा गुन्हा असल्याची ऑफ रेकॉर्ड माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. नवाब मलिक यांचा सवाल आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना ट्विट करून विचारले आहे की, तुमची मेहुणीही ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? नवाब मलिक यांनी नवा दावा केला आहे की, समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात ड्रग्जचा खटला सुरू आहे या प्रश्नाला समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे.

Team Global News Marathi: