सदभाव फाउंडेशन व योगी डिवाइन सोसायटीचा कौतुक समारंभ

सदभाव फाउंडेशनच्या नीता दोशी व योगी डिवाइन सोसायटी, पवई (अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर) यांनी संयुक्त विद्यमाने ८७०० मास्क व १००० पार्थिव नेण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग सायन रुग्णालयास दान दिल्या.

त्याचप्रमाणे अविश्रांत, निस्वार्थीपणे सेवा देणारे तेथील कर्मचारी यांना प्रोटीन युक्त अन्न धान्य उदा. उत्तम प्रकारची मुग डाळ, चणा व शेंगदाणा चिक्की पण देण्यात आली. वरील सर्व कामात नीता दोशी यांनी व्यक्तिगत लक्ष देऊन covid-19 प्रतिबंधक कार्यास हातभार लावला.

हे सर्व सामाजिक कार्य बघून सायन रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी,डॉ.विद्या महाले,डॉ. प्रकाश गायकवाड व MSW विभाग महाराष्ट्र शासन यांनी कौतुक प्रमाणपत्र देऊन वरील दोन्ही संस्थांचा गौरव केला.

Team Global News Marathi: