“कोणतेही दाखले काढायचे असल्यास काढून मिळतील “नवाब मलिक झेराॅक्स सेंटर” भाजपा आमदाराने लगावला टोला

 

मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगले शीतयुद्ध पेटलेले पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला फोटो, त्यांचा जन्माचा दाखला, निकाहनामा असं सारं ट्विट केलं होत.

आता याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी नवाब मलिकांना झेरॉक्स सेंटर, असा खोचक टोला लगावला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे. ‘कोणाच्या लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले हवे असतील तर संपर्क करा. काहीही पुरावे नसतील तरी काढून मिळतील’, असं म्हणत पुढे नवाब मलिक झेरॉक्स सेंटर, असंही लिहीलं जोरदार टोला लगावला आहे.

मागच्या काही दिवसांपासून नवाब मलिक सतत समीर वानखेडेंच्या विरोधात नवनवीन पुरावे सादर करत आहेत. त्यांनी समीर वानखेडेंच्या लग्नाचा निकाहनामा ट्विट करून वानखेडे मुस्लिमच असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी समीर वानखेडे यांच्या जातीचा दाखलाही ट्विट केला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली होती.आता भाजपचे आमदार यांनी याच मुद्दयावरून नवाब मलिकांना जोरदार टोला लगावला होता.

Team Global News Marathi: