आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील युवती अखेर साताऱ्यात सापडली

अमरावतीमध्ये आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर
काल खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये चांगलीच चकमक उडाली होती. काल पोलिस ठाण्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. खासदार नवनीत राणा यांनी ज्या मुलीला शोधण्यासंदर्भात काल पोलिसांना अल्टिमेटम दिलं होतं ती मुलगी अखेर सापडली आहे. कालच तिचा शोध लागला असून ती साताऱ्यात सापडली. तिला आज अमरावती पोलिस घरी आणणार आहेत.

ही मुलगी सातारा पोलिसांच्या ताब्यात होती. आज ती युवती अमरावतीला येणार आहे. काल ज्या पोलिसांसोबत खासदार नवनीत राणा यांनी खडाजंगी केली. त्याच पोलीस अधिकाऱ्यांचं भाजपने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.

यावेळी अमरावती पोलिस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी माहिती दिली की, ही युवती एकटी रेल्वेने प्रवास करत होती. आम्ही पुणे रेल्वे पोलीस आणि सातारा पोलिसांशी लोकेशन शेअर केलं आणि अखेर सातारा पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतले. अमरावती पोलीस साताऱ्यासाठी रवाना झाली असून ती आज (8 सप्टेंबर) अमरावतीत दाखल होईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी काल दिली.

मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह काल थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Team Global News Marathi: