अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब याच्या विविध जागांवर सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीत कोट्यावधी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.या छापेमारीत मोहम्मद याकूबच्या घरातील काउंटिंग संपली आहे. त्याच्या घरात बँक कर्मचाऱ्यांनी नोटा मोजण्यासाठी मशीन आणली होती. बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाच्या ठिकाणाहून तब्बल ४ ते ५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोनंदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
अद्यापही आयकर विभागाची टीम तपास करीत आहे. कन्नौजमध्ये मोहम्मद मलिक परफ्यूमर्सच्या घरात आणि फॅक्टरीत सापडलेल्या कागदपत्रांसाठी एक फोटो स्टेट मशीनदेखील मागवण्यात आली. मोहम्मद मलिक हा याकूब मलिक याचा लहान भाऊ आहे. परफ्युम्सचा मुख्य व्यवसाय मोहम्मद मलिक याचे दोन्ही मुलं पाहतात.
मोठा मुलगा मुंबईतील व्यवसाय पाहतो आणि लहान मुलगा फैजान कन्नोजमध्ये व्यवसाय पाहता. फैजानची सासरची मंडळीदेखील अत्तर व्यवसायाशी जोडलेली असल्याचं सांगितलं जात आहे. १८८६ मध्ये मोहम्मद अयूब आणि मोहम्मद याकूबने स्वत:च्या नावाने फर्म तयार केली होती. यापूर्वी इनकम टॅक्स आणि डीजीजीआयने अत्तर व्यावसायिक पीयूष जैन याच्या कानपूर आणि कन्नोजसह अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. कानपूर आणि कन्नोज येथून मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोनं ताब्यात घेण्यात आलं. याची एकून किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.