युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी

 

रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक रोद्ररूप घेताना दिसून येत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन हादरलं आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह खार्कीवमध्ये हल्ले अधिक तीव्र केले आहेत. त्यात या युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रशियाने खार्कीव येथे केलेल्या मिसाईल हल्ल्यात कर्नाटकातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. सदर घटना ताजी असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. हा विद्यार्थी या गोळीबारात जखमी झाला असल्याची माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांनी दिली आहे.

गोळी लागलेला हा विद्यार्थी युक्रेनमधुन मायदेशी परत येण्यासाठी निघाला होता. त्याला गोळी लागल्यानंतर उपचारासाठी अर्ध्या वाटेतून परत नेण्यात आलं. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाल्याचं सिंग यांनी सांगितलं. आणखी एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

Team Global News Marathi: