संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का : ज्येष्ठ गायक – संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का : ज्येष्ठ गायक – संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे. ते 69 वर्षांचे होते. मुंबई येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सार्वजनिक जीवनात बप्पीदा अशी ओळख असलेल्या लाहिरी यांनी 1970-80च्या दशकात अनेक गाणी संगीतबद्ध केली. चलते चलते, डिस्को डान्सर, शराबी या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. 2020मध्ये आलेल्या बागी 3 या चित्रपटातील भंकस हे गाणं त्यांचं अखेरचं गाणं होतं.

बप्पी लाहिरी यांचं खरं नाव अलोकेश लाहिरी असं होतं. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगाल येथील जलपायगुडी इथे झाला. तीन वर्षांचे असतानाच बप्पीदांनी तबला वाजवायला सुरुवात केली. 17 व्या वर्षापासूनच त्यांचं संगीतकार बनायचं स्वप्न होतं.

बॉलिवूडला प्रेमगीतांमधून बाहेर काढून डिस्को डान्स करायला लावणारा संगीतकार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1972 साली प्रदर्शित झालेल्या दादू या बंगाली चित्रपटापासून केली. तर नन्हा शिकारी या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये श्रीगणेशा केला. जख्मी (1975) या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली.

पंतप्रधानांनी बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्री बप्पी लाहिरीजींचे संगीत चौफेर होते. वेगवेगळ्या भावना व्यक्त करणार होतो. अनेक पिढ्यांतील लोक स्वतःला त्याच्या संगीताशी जोडलेले अनुभवू शकतात. त्यांचा आनंदी स्वभाव सर्वांच्या स्मरणात असेल. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती

बप्पी लाहिरी सारख्या दिग्गजाचे आकस्मिक निधन पाहून खूप दुःख झाले. तेही अशा वेळी जेव्हा देशाने आपले एक मौल्यवान रत्न लता मंगेशकर गमावले. बप्पी दा यांच्या निधनावर स्टार्सही शोक करत आहेत. बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहताना अजय देवगणने लिहिले की, ‘बप्पी दा खूप सुंदर व्यक्ती होते. पण त्याच्या संगीतात एक धार होती. चलते चलते, सुरक्षा, डिस्को डान्सर यांसारख्या हिंदी चित्रपटांच्या संगीताला त्यांनी एका वेगळ्या समकालीन शैलीची ओळख करून दिली. शांती दादा, तुझी खूप आठवण येईल. क्रिकेटर युवराज सिंगसह इतर सेलिब्रिटींनीही बप्पी दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: