लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नववधूचा मृत्यू, तरीही दिलं चौघांना जीवदान

धुमधडाक्यात लग्न आटोपलं. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या रिसेप्शनची पार्टी सुरू होती. सुखी संसाराचं स्वप्न बघणाऱ्या नवविवाहित जोडप्याला सर्वजण शुभेच्छा देत होते. पण, फोटोशूट करताना काही कळायच्या आत नववधू खाली कोसळली. यातच नव्या संसारात पाऊल टाकताच तिचा मृत्यू झाला आहे. तरीही तिनं चार जणांचे प्राण वाचवले.

चैत्रा के. आर. ही २६ वर्षीय तरुणी कर्नाटकातील (Karnataka) कोडीचेरयू गावातील रहिवासी होती. ती तिच्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिनं बंगळुरूमधून एमएस्सी केलं होतं. तसेच आता बीएड करत होती. तिला प्राध्यापिका बनायचं होतं. त्याचीच तयारी म्हणून ती तालुक्यातील एका महाविद्यालयात दोन वर्षांपासून शिकवत होती. ती आता एखाद्या खासगी महाविद्यालयात प्राध्यापिकेच्या नोकरीच्या शोधात होती. आपल्या एकलुत्या लेकीच्या लग्नामुळे आई-वडील देखील आनंदात होते. लग्न तर झालं, पण लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सर्वांच्या आनंदात विरजण पडलं.

चैत्रा फोटो काढताना अचानक स्टेजवर कोसळली. त्यानंतर तिला निम्हास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिच्या मेंदूला गंभीर जखम झाल्याने तिचा मेंदू मृत झाला होता. त्यामुळे तिला वाचवणं शक्य नव्हतं. आपली मुलगी तर गेली, पण तिच्यामुळे इतरांना जीवदान मिळावं यासाठी आई-वडिलांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. दोन किडन्या, हॉर्ट व्हाल्व आणि दोन्ही डोळ्यांचे पडदे हे दान करण्यात आले. त्यानंतर कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी स्वतः मुलीच्या आई-वडिलांचं कौतुक केलं. तसेच तिच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं.

साभार सकाळ

ग्लोबल न्युज नेटवर्क: