आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार ?

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहीटमध्ये दाखल झाले आहे. पोलीस बंदोबस्तात 2 वाहनं हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या 3 आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, हे तीन आमदार नेमके कोण आहेत हे समोर येऊ शकलेलं नाही.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांच मनपरिवर्तन होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर शिवसेनेच्या बंडेखोर आमदारांच्या बंदोबसत्ता मोठी वाढ करण्यात आली आहे. हॉटेल रेडीसन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा हे बंडखोर आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांचं मनपरिवर्तन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: