अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून कर्मचारी आंदोलन करत असून अद्याप हे आंदोलन अधिक चिघळताना दिसून येत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आता त्या पाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवारांनी भेट घेतली आहे. शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. बैठकीत काय घडलं? परीवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे १० मिनटे चर्चा झाली.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या प्रकरणात समन्वयाने सुवर्णमध्य काढत संप कसा मिटवता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे.

हा प्रस्ताव आजच तयार करून संपकरी कर्मचारी संघटनांना दिला जाणार आणि त्यावर समाधान कारक तोडगा काढला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेत संप मिटवण्यासाठी निर्णायक चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईसह इतर नेते सोबत होते. या बैठकीनंतर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. ‘एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार साहेबांच्या कानावर घातले आहेत.

Team Global News Marathi: