अकोल्यात किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल होणार? शिवसेनेने केले आरोप !

 

 

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सतत महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे. भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला असून शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी सत्कार स्वीकारल्यामुळे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात आज शिवसेना निवडणूक अधिकाऱ्यांडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

 

 

समोर आलेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. सगळ्यांवर ईडीची कारवाई होणार असल्याचं ते म्हणत आहेत. यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं असताना आता सत्ताधारीदेखील त्यांच्यावर निशाणा साधण्यात पुढे आहेत.

 

सध्या अकोला जिल्ह्यात विधान परिषदेची आचारसंहिता सुरू आहे. किरीट सोमय्या हे काल बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. बुलढाणावरून ते अकोला इथे आले होते विश्रामगृहात भाजपच्या दोन आमदार व कार्यकर्त्यांकडून त्यांनी सत्कार स्वीकारला. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर अद्याप किरीट सोज्य्य यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

 

 

 

Team Global News Marathi: