अनिल परबांच्या अटकेनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

 

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ढवळ्या शेजारी पवळ्या गेला, वान नाही पण गुण लागला. लवासा, सिंचन, आदर्श हे सगळ्या गोष्टीचा पिठारा ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या नादाला लागल्यानंतर काही गुण अंगात संचारणार यात दुमत नाही. त्याचेच प्रारुन म्हणजे मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याची उकल होत राहणार, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. यावेळी, त्यांच्यासमेवत काही एसटी कामगार हेही उपस्थित होते.

एसटी कामगारांची तळतळ, हळहळ याचेच हे परिणाम असून जैसी करणी वैसी भरणी, ही कर्माची फळं आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सर्वसामान्य कष्टकरी माणसाला त्या पदावर बसवायला हवं होतं, असे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी अनिल परब यांच्या अटकेचं समर्थन केले. तसेच, लाडू वाटून आनंद व्यक्त केला, जे होतंय त्या गोष्टीचं हे समर्थन असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांसह लाडू खाऊन त्यांनी जल्लोष व्यक्त केलं.

Team Global News Marathi: