अनिल देशमुख यांचा अहवाल लीक केल्याप्रकरणी थेट CBI च्या अधिकाऱ्याला अटक

 

CBI ने माजी गृहमती अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवलेल्या असताना आता देशमुख यांच्या चौकशीचे अंतर्गत कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी स्वतःच्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, याआधी बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चतुर्वेदी यांची सीबीआयने चौकशी करुन त्यांची सुटका केली आहे. चतुर्वेदी वरळीतील सुखदा या इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. मात्र दुसरीकडेअनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच डाग यांच्या ठिकाणावर सुद्धा CBI ने छापे टाकले आहेत.

सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्यानंतर अटक करण्यात आली. इंडिया टुडेच्या सूत्रांनुसार ते कथितपणे अनिल देशमुखांच्या वकिलाच्या संपर्कात होते. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.

“सीबीआयने आपले उपनिरीक्षक, नागपूरस्थित वकील आणि अज्ञात इतरांच्या विरोधात लाचप्रकरणी काही आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सीबीआयने बुधवारी उपनिरीक्षकाला अटक केली आहे. तसेच वकिलाची चौकशी केली जात आहे, ”असे सीबीआयचे प्रवक्ते आर सी जोशी यांनी इंडिया टुडेला सांगितले.

Team Global News Marathi: