अनिल देशमुखांच्या तुरूंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला मोजावी लागेल” शरद पवारांचे विरोधकांना थेट आव्हान

 

नागपूर | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप लगावला होता. त्यानंतर ईडी आणि सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. त्याप्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला धमकीवजा इशारा दिला आहे.

राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. काही लोकांच्या हातातून सत्ता गेली त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या यंंत्रणांच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. माजी गृहमंत्री ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना तुरूंगात टाकले आहे. त्यांच्या प्रत्येक तासाची किंमत भाजपला आज ना उद्या मोजावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.

यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंह भेटायला आल्याचं देखील सांगितलं. एक दिवस मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले की, अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार आहे. ती तक्रार मला मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायची आहे. त्यांना राज्य सरकारने फरार घोषित केलं आहे.
मी विचारले काय तक्रार आहे. त्यांनी सांगितलं की, आम्हाला अशा सुचना दिल्या आहेत. मी विचारले त्या सुचनांचे पालन केले का? त्यांनी सांगितलं नाही. पोलीस आयुक्तांची तक्रार देशमुख यांना समजली. ते माझ्याकडे आले तसेच ते म्हणाले की, आरोपांची शहानिशा होईपर्यंत मी राजीनामा देतो, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: