गृहमंत्र्यांच्या घरासमोरचा तंबाखुजन्य पदार्थाची सर्रास विक्री

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोरच तंबाखुजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र नागपुरात दिसून आले आहे. राज्य शासनाने बंदी घातलेला खर्रा, सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला असा साठा गृहमंत्र्यांच्या नागपुरात सहज उपलब्ध होत असलेला पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्र टाइम्स यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

एकीकडे राज्यात अवैद्य गोष्टींना आळा घालण्याच्या वार्ता करणाऱ्या गृहमंत्र्यांच्या घराशेजारीच हा प्रकार घडत असल्याचे निर्देशनास आले आहे. राज्य शासनाने खर्राबंदी केली आहे. कुणी असे पदार्थ विकताना दिसले तर त्यांच्यावर थेट न्यायालयीन खटले भरले जातात. आर्थिक दंडासह कारागृहाची शिक्षाही ठोठावली जाते.

मात्र कायद्यात अशी कठोर तरतूद असतानाच चक्क गृहमंत्र्यांच्या घरासमोरच कायद्याचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरात खर्रा एवढ्या सहज मिळू लागला की, खर्राबंदी आहे, असे कुणाला सांगितले तर आश्चर्य वाटेल. खर्रा मिळवण्याचा सहज साधा मामला येथे आहे असे आता वाटत आहे.

Team Global News Marathi: