निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते महाजनांनी लगावला ठाकरे सरकारला टोला

 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही केंद्रीय भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आता त्या पाठोपाठ भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एका पाठोपाठ ट्विटकरून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला आहे. कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील ह्या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे.

पुढे महाजन आणखी एक ट्विट करून म्हणतात की, एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती.

Team Global News Marathi: