शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री ; जाणून घ्या दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हायकोर्टाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. त्यामुळे नैतिकता म्हणून अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल, अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चांवर पडदा पडला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांचेच नाव सूचवले होते. पण, प्रकृतीच्या कारणास्तव दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. सध्या त्यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि कामगार खातं आहे. गृहमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचं खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे-पाटील कोण आहेत?

दिलीप वळसे पाटील (जन्म ३० ऑक्टोंबर १९५६) माजी काँग्रेस आमदार आणि शरद पवार यांचे मित्र दत्तात्रय वळसे पाटील यांचे पुत्र आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. १९९० साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावरुन आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली होती. तेव्हापासून ते आंबेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. १९९९ मध्ये त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.  मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात ते मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे उर्जा आणि वैद्यकीय शिक्षण खातं होतं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणूनही सेवा दिली आहे.

दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहावेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी १९९९ ते २००९ या काळात अर्थ आणि योजना खातं, उर्जा मंत्रालय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) चे अध्यक्ष आहेत. दिलीप वळसे-पाटील  हे शरद पवार यांचे जवळचे मानले जातात.   5 फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.

दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.

दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत.

2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.

युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या विधीमंडळ कामाच्या आणि कायदेशीर प्रक्रियांच्या खडानखडा माहितीमुळे आघाडी सरकारला चांगलंच बळ मिळालं होतं.

शिक्षणापासून राजकारणापर्यंतचा प्रवास

नाव : दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
जन्म : 30 ऑक्टोबर, 1956
जन्म ठिकाण : निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे .
शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), डी. जे., एल.एल.एम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती किरण
अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी)
व्यवसाय : शेती व व्यापार
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मतदारसंघ : 196 – आंबेगाव, जिल्हा पुणे.

इतर माहिती : महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात तसेच सहकारी चळवळीमध्ये राज्यातील नेत्यांच्या सानिध्यात राहून सक्रिय सहभाग; संस्थापक – अध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे, या संस्थेमार्फत ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले; ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देऊन संस्थांचे जाळे विकसित केले व त्याद्वारे सर्वसामान्य जनता विशेषतः ग्रामीण महिला वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य; विश्वस्त. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंधः संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; संस्थापक-चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना.

1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 1992-93 समिती प्रमुख, विधिमंडळ अंदाज समिती सन 1998-99 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेतील “उत्कृष्ट संसदपटू” या पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर, 2002 उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर, 2002 ते नोव्हेंबर 2004 ऊर्जा, व उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2004 ते मार्च 2005 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून) व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री; मार्च 2005 ते डिसेंबर 2008 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर 2008 ते ऑक्टोबर, 2009 वित्त व नियोजन खात्याचे मंत्री;

मंत्रीपदी कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनीय निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ या कंपनीची स्थापना करून गतीने विकास केला, त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्त्वाचे कार्य होऊ शकले विद्युत कायदा 2003 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली; ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडमॅप केला, 6000 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले; 2009-2014 अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा; या काळात विधान मंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .

2012-13 मध्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामाहिम प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले; तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

ग्लोबल न्युज नेटवर्क: