अनिल देशमुखांवरील सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशावरून, सचिन सावंत यांचा आरोप

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच ईडीने अनिल देशमुखांची ३०० कोटींची संपत्ती जप्त केल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. यानंतर ईडीने अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ४ सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून सावंत यांनी मोदी सरकारवर आरोपही लावला आहे.

सचिन सावंतांनी ईडीला चार सवाल केले यासोबतच मोदी सरकावर गंभीर आरोपही केले आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे राज्यातील आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही सावंत यांनी केला. सावंतींनी ट्विट केले की, ‘या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने आणि महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत या आमच्या म्हणण्याला यातून बळ मिळत आहे.’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख एपीआय सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिले असल्याचा आरोप परमबीर सिंहांनी यांनी केला आहे

Team Global News Marathi: