अनिल देशमुख ही मोगलाई नाही, जयश्री पाटील यांची कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया !

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच CBI ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. या छापेमारीमुळे पुन्हा एकदा आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.

त्या म्हनालये की, मी सांगितले होते, अनिल देशमुख ही मोगलाई नाही. तुम्ही मुगलांसारखे भ्रष्टाचार करुन या देशाला लुटू शकत नाही. हे संविधानाच, भारतीय कायद्याचे राज्य आहे. भारतमातेची अशा प्रकारे लुट करुन शकत नाही. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. CBI ने FIR दाखल केला आहे तो सिद्ध झालाय ही राज्याच्या तमाम जनतेची जीत आहे अशी प्रतिक्रिया जयश्री पाटील यांनी दिली.

पुढे जयहसरी पाटील म्हणाल्या की, मी CBI ला मलबार हिल पोलीस स्टेशनची कॉपी दिली. चौकशीत मदत केली. पुरावे सादर केले. म्हणून CBI ने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली. अनिल देशमुख यांना अटक झालीच पाहिले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत असे जयश्री पाटील म्हणाल्या. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येणार आहे.

Team Global News Marathi: