“अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे राष्ट्रवादीने स्पष्ट करावे”

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटींच्या वसुली आरोपाच्या प्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. ईडीने तब्बल ५ वेळा समन्स बजावून देखील देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला आहे.

दरेकर म्हणाले की, अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. पोलिस आयुक्त कुठे बेपत्ता आहेत कळत नाही. ते मुंबई आहेत का कुठे हे कळत नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुख कुठे आहेत हे सांगायला हवे. आपल्या खात्यातील माणूस कुठे आहे हे माहित नसणे यावरून पोलिस खात्यात काय गोधळ सुरू आहे हे स्पष्ट होत. ‘अनिल देशमुख कुठे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगावे, असे प्रविण दरेकर यांनी म्हंटल.

दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहे. मात्र, देशमुख गैरहजर राहिल्यानंतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही असं सुद्धा ईडीकडून स्पष्ठ करण्यात आलेले आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याकडून या प्रकरणी देशमुखांना अडकवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप लावण्यात येत आहे.

Team Global News Marathi: