अनिल देशमुख विरोधात तक्रार दाखल, वाचा कोणी केली तक्रार

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपावरून राज्यात एकच खळबळ माजली होती.

त्यात विरोधकांनी सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच आघाडीवर संपूर्ण विरोधक तुटून पडले होते. या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली आहे. ‘भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,’ असं पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटंल आहे.

Team Global News Marathi: